अहिल्यानगर पोलीस त्या अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्यात यशस्वी ठरणार का की स्वतःच अपयश सिद्ध करणार?
संशयित शिक्षण क्षेत्राशी संबंधित असल्याची सूत्रांकडून मिळतेय माहिती
अहिल्यानगर / प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा गुन्हा 19 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6:40 वाजता नोंदविण्यात आला. ही घटना 14 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5:30 वाजता नेवासा–शेवगाव रोड, भानस परिसरात घडली.
तक्रारदार मोहीनीराज शिवाजी डाके (वय 32, रा. ढोरजळगाव, ता. शेवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या मोटारसायकलवरून जात असताना अज्ञात वाहन चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. चालक दारूच्या नशेत असल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत असून अज्ञात वाहन व चालकाचा शोध सुरू आहे.









