मुंबई : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा दुसरा उपांत्य सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघात खेळवण्यात आला. यात भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. आता भारतीय संघ फायनल सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळेल. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणर आहे. रविवारी 8 मार्च रोजी फायनल सामन्याचा थरार अहमदाबादमध्ये पाहायला मिळणार आहे.










