आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देवगड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

देवगड : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने देवगड येथील देवगड मेडिकल फाउंडेशनतर्फे रविवारी, दि. ८ मार्च २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.०० ते दुपारी १२.०० या वेळेत हे शिबिर पार पडणार असून Maharashtra Orthopaedic Association, IMA कणकवली व देवगड मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या शिबिरात विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये अस्थिरोग तज्ञ डॉ. तन्मय आठवले, शल्यचिकित्सक डॉ. महेंद्र आचरेकर, स्त्रीरोग तज्ञ डॉ. अर्पिता आचरेकर, फिजिशियन डॉ. रिया जैन आठवले तसेच नेत्र तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर केदार हे उपस्थित राहणार आहेत.
NAB आय हॉस्पिटल, देवगड यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार असून मोतीबिंदू शस्त्रक्रियेस २० टक्के तसेच चष्म्यांवर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
शिबिरामध्ये बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट, पेरिफेरल न्युरोपॅथी तपासणी, ईसीजी, पल्मोनरी फंक्शन टेस्ट (PFT), रक्तातील साखर तपासणी, HbA1c तसेच आवश्यकतेनुसार लिपिड प्रोफाइल या तपासण्या मोफत उपलब्ध राहणार आहेत. तसेच गरजेनुसार एक्स-रे तपासणी ५० टक्के सवलतीत करण्यात येणार आहे.
देवगड मेडिकल फाउंडेशनने मागील अनेक वर्षांत महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये १००० हून अधिक मोफत आरोग्य शिबिरे यशस्वीरीत्या आयोजित केली असून सामाजिक आरोग्य सेवेत संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. DMF हेल्थकेअर प्रा. लि.चे संचालक डॉ. सुनील आठवले व डॉ. सौ. मंजुषा आठवले यांनी परिसरातील नागरिकांनी विशेषतः महिलांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
हे शिबिर देवगड मेडिकल फाउंडेशन, SBI बँकेसमोर, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ७३८२८२१००० किंवा ७३८२८२२००० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे