मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे साहेब यांच्या प्रयत्नला यश
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सततचा पाठपुरवा
कोकण विभागातील दुर्गम, डोंगराळ, सागर किनारपट्टी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्याने अनेक मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये होत्या, त्याकरता मंत्री मा. श्री उदय सामंत साहेब, मंत्री मा. श्री. नितेश राणे साहेब, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार किरण सामंत, आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितत शिक्षण मंत्री मा. श्री दादा भुसे साहेब यांच्या दालनात सर्व अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली.
सदर बैठकीमध्ये दोन्ही मंत्री महोदय आणि आमदार महोदयांनी कोकणातील भौगोलिक परिस्थितीची, लोकसंख्येची बाजू मांडून विद्यार्थी संख्या कमी का त्याचे कारण समजावून दिले, तसेच शाळांच्या अंतरामध्ये वस्तुस्थिती पाहिली पाहिजे, या सर्व गोष्टींचा विचार करून, विद्यार्थी संख्येचे निकष शिथिल करा अशी जोरदार मागणी केल्यानंतर पहिली ते आठवीच्या वर्गात कितीही विद्यार्थी असले तरी शिक्षक एक मंजूर होणार , तसेच नववी दहावीच्या वर्गात किमान 10 विद्यार्थी एका वर्गात असल्यास शिक्षकाचे पद मंजूर होईल. अशा प्रकारचा दिलासादायक निर्णय झाला.
त्यामुळे कोकण विभागातील अनेक मराठी माध्यमाच्या बंद पडणारे वर्ग वाचतील तसेच अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकना दिलासा मिळालेला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यांमध्ये लागू होईल
या निर्णयामुळे मंत्री दादाजी भुसे साहेब, मंत्री उदय उदयाची सामंत साहेब, मंत्री नेत नितेशजी राणे साहेब, कोकणाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर, आमदार किरण सामंत साहेब,आमदार महेंद्र दळवी साहेब यांचे खूप खूप आभार, मंत्री महोदय उदय सामंत साहेब यांच्या आदेशान्वये रत्नागिरी मधील मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, संदेश राऊत सर, मुल्ला सर, पाटकर सर,tdf संघटनेचे अध्यक्ष सागर पाटील सर, प्राथमिक संघटनेचे देवळेकर सर व अन्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते