सुकळवाड येथील एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षमित्र लेखक श्री. प्रकाश काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयात सन 2015 साली महाविद्यालयाच्या निसर्गरम्य परिसरामध्ये नक्षत्रवनप्रमाणे वृक्षारोपण करण्यात आले. “एक झाड देशासाठी” या उद्देशाने निसर्गरम्य वातावरणामध्ये महाविद्यालयात 268 हून अधिक नक्षत्र वनामध्ये झाडे लावण्यात आली. सुंदर पर्यावरण पशु-पक्षी यांच्यासह रममाण होण्याची आवड असणारे श्री. प्रकाश काळे यांनी सन 2015 मध्ये या महाविद्यालयात दुर्मिळ अशा प्रकारची वनस्पतीची लागवड केली होती. त्यांनी विद्यार्थ्यांना हे महाविद्यालय एका निसर्गरम्य अशा सुंदर वातावरणात आहे. त्याचा तुम्ही अभ्यासासोबतच आनंद घ्या. असेही सांगितले विद्यार्थ्यांना ऑक्सिजनचे, निसर्गाचे महत्त्व पटवून दिले व या संदर्भात मार्गदर्शन केले. त्यांचे वनस्पती जीवाचे असलेले नाते त्यांनी 65 कवींमध्ये पहिली सादर केलेली कविता “शाप” ही विद्यार्थ्यांसमोर सादर केली. ही कविता सादर करताना श्री. प्रकाश काळे सर भावूक झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही आपल्या मनात वृक्षांविषयी चे महत्व तसेच त्यांच्या सजीव पणाची जाणीव निर्माण झाली. ते विद्यार्थ्यांना म्हणाले वनस्पती झाड जगेल तर आपण जगणार आहोत. स्वतःच्या रक्षणासाठी झाडे लावा श्री. प्रकाश काळे यांना महाराष्ट्र वृक्ष भूषण, डायमंड ऑफ महाराष्ट्र ऑफ महाराष्ट्र इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत. यावेळी या कार्यक्रमास वनस्पती औषध संशोधक श्री. विनायक बापट, श्री. उदय पुरोहित, तसेच संस्थेचे विश्वस्त, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.