‘जय जगन्नाथ’च्या जयघोषात मुंबई दुमदुमली; मंत्री नितेश राणेंची रथयात्रेत उपस्थिती

मुंबई : मुंबईतील इस्कॉन जुहू (ISKCON Juhu) द्वारे आयोजित भगवान श्री जगन्नाथ यांच्या पवित्र रथयात्रेनिमित्त, त्यांच्या ४५ व्या वार्षिक रथयात्रा महोत्सवात मंत्री नितेश राणे कुटुंबासह सहभागी झाले. या प्रसंगी, भगवान श्री जगन्नाथ यांचे दिव्य रूप पाहणे, रथ ओढणे आणि त्यांच्या चरणकमलांशी नतमस्तक होऊन आशीर्वाद प्राप्त करणे हे परम भाग्य मिळाले.

भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून समानता, सेवा, श्रद्धा आणि माणुसकीचा संदेश देणारा एक पवित्र उत्सव आहे. अंधेरी येथील श्री जगन्नाथ मंदिरातून सुरू होणारी ही भक्तिमय रथयात्रा इस्कॉन जुहू येथे पोहोचल्यावर भक्तीच्या परमानंदात विलीन होते.

भगवान श्री जगन्नाथ यांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगती नांदो, हीच त्यांच्या चरणकमलांशी प्रार्थना आहे.

या मंगलमय कार्यक्रमास महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष व आमदार अमित साटम यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

जय जगन्नाथ! 🙏🚩