देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीत तातडीने आवश्यक असलेल्या विविध महत्त्वपूर्ण विकासकामांना मंजुरी मिळावी, यासाठी नगरसेविका तन्वी चांदोसकर यांनी नगराध्यक्षांना लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे. यासंदर्भात सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन आवश्यक तो ठराव घेण्यात आला.
नगरपंचायत हद्दीत प्राधान्याने हाती घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये जामसंडे येथे व्यापारी संकुल उभारणे,देवगड बीच परिसरात पार्किंग सुविधा, महिलांसाठी बचत गट स्टॉल्स,देवगड बीचवरील अत्यावश्यक शौचालय व चेंजिंग रूम उभारणी,जामसंडे येथे साप्ताहिक बाजारपेठ विकसित करणे,तसेच देवगड-जामसंडे नगरपंचायतमध्ये म्युझिक लायब्ररी, प्रेस क्लब व टर्फ ग्राउंड उभारणी या विशेष विकासकामांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली.
नगरसेविका चांदोसकर यांनी सांगितले की, देवगड-जामसंडे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी ही कामे अत्यंत गरजेची असून नागरिकांच्या सुविधा आणि पर्यटनाच्या वाढीसाठी त्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. कोकणशाही देवगड
