नेरूर दुर्गावाड येथे धडाडणार शिवसेनेचे फायरब्रँड आ. निलेश राणे यांची तोफ

नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. नेरूर दुर्गावाड याठिकाणी शिवसेना फायरब्रँड आमदार निलेश राणे यांची तोफ धडाडणार आहे. शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी सायंकाळी ठीक 5 वा. आ. निलेश राणे यांच्या कॉर्नर सभेचे याठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. या सभेला जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद मतदारसंघांचे उमेदवार संजय पडते तसेच पंचायत समिती गणाचे उमेदवार आदी सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून या कॉर्नर सभेला स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.