नेरूरमध्ये भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन; प्रथम क्रमांकास १५ हजार रुपयांचे पारितोषिक

नेरूर येथील ‘रणझुंजार मित्र मंडळ’ आणि जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य ‘कलेचा देव कलेश्वर दहीहंडी स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सायंकाळी ५:०० वाजता नेरूर चव्हाटा येथील हनुमान मंदिर प्रांगणात पार पडणार आहे.

​आकर्षक पारितोषिके
स्पर्धेतील विजेत्या गोविंदा पथकांसाठी भरघोस पारितोषिके ठेवण्यात आली आहेत:
​प्रथम क्रमांक: ₹१५,०००/- रोख रक्कम व आकर्षक चषक
​द्वितीय क्रमांक: ₹७,५००/- रोख रक्कम व आकर्षक चषक

​संपर्क व नोंदणी-:
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन रणझुंजार मित्र मंडळ, नेरूर यांच्या वतीने करण्यात आले आहे:
​संतोष परब : ७२६३००३०९७
​कल्पेश मार्गी: ८३९०६१६७६०
​प्रविण नेरुरकर: ९४२२९४८०२४