सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील CRZ प्रश्न ऐरणीवर; आमदार निलेश राणे व मंत्री नितेश राणेंनी घेतली मंत्रालयात बैठक

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरील CRZ (Coastal Regulation Zone) संदर्भात तसेच NCLT मध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणाबाबत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी मंत्रालयात बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी मालवण शहर व परिसरातील विविध विकासकामे तसेच प्रलंबित प्रश्नांवरही सकारात्मक चर्चा करण्यात आली. बैठकीस स्थानिक आमदार निलेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मालवण नगरपरिषदेचे नगरसेवक सहदेव बापर्डेकर, माजी नगरसेवक जॉन नऱ्होना तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.