कुडाळ : लाईट संबंधित तक्रारींचा वाचला पाढा. यावेळी शहरातील उद्भवणाऱ्या विविध समस्यां बाबत तसेच जुने जीर्ण झालेले लाईट पोल,कमी दाबाच्या होणाऱ्या वीज पुरवठा संबंधी वेधले लक्ष. वीज वाहक तारांवर आलेल्या जीर्ण धोकादायक झाडे तात्काळ तोडण्यासंबंधी केल्या सूचना. तसेच वारंवार वीज खंडित केल्यामुळे शहरात असलेल्या गणेश शाळाना होणाऱ्या त्रासासंबंधीही केल्या सूचना. गणेश चतुर्थीच्या पूर्वी शहरात निर्माण होणाऱ्या तक्रारीचे तात्काळ निवारण करण्यासाठी दिला अल्टिमेट. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राजू राउळ, तालुका चिटणीस राजू गवंडे, शहराध्यक्ष सुनील बांदेकर महिला शहराध्यक्षा सौ.मुक्ती परब, नगरसेविका सौ.श्रेया गवंडे, सौ.ज्योती जळवी, नगरसेवक उदय मांजरेकर, निलेश परब, माजी नगरसेवक सचिन काळप उपस्थित होते.












