
देवगड : देवगड-जामसंडे गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री दीर्बादेवी-रामेश्वर देवस्थानच्या त्रिपुरारी पौर्णिमा यात्रा उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच, महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी यात्रेला भेट देत श्री दीर्बादेवी आणि श्री रामेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी देवस्थानात धार्मिक वातावरणात दर्शन घेतले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पाळीदार दीपक घाडी उपस्थित होते.
या प्रसंगी माजी आमदार अजित गोगटे, मंडल तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, संदीप साटम, देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हरिदत्त माने, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, गटनेते शरद ठुकरुल, वैभव करंगुटकर, सर्व नगरसेवक, योगेश चांदोसकर, दयानंद पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जामसंडे येथे सुरू असलेल्या या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामदैवताचे दर्शन घेतल्याने उपस्थित भाविक आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.












