महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात ७६ हजार कोटींची गुंतवणूक! पालकमंत्री नितेश राणेंनी दिली मोठी माहिती

गोरेगाव, मुंबई : Federation of Indian Chambers of Commerce and Industry (FICCI) यांच्या वतीने नेस्को, गोरेगाव येथे २ ते ४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान आयोजित ४थ्या Maritime India Conference & Expo 2026 चे उद्घाटन मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पार पडले. यावेळी महाराष्ट्राच्या पोर्ट आणि मेरिटाइम क्षेत्रातील गुंतवणुकीच्या विविध संधी, पायाभूत सुविधांचा विकास, तसेच या क्षेत्राच्या भविष्यातील योजनांबाबत भूमिका मांडली.

आदरणीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदर, शिपिंग, लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्रात जागतिक स्तरावर आपली क्षमता विस्तारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज आहे.

महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा, नैसर्गिक बंदरे, मजबूत औद्योगिक पायाभूत सुविधा आणि निर्यातीसाठी उपलब्ध असलेली अनुकूल व्यवस्था यामुळे पोर्ट इंडस्ट्रीसाठी महाराष्ट्र हे महत्त्वाचे केंद्र ठरू शकते. या क्षेत्रात तब्बल ७६ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले असून, गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी वन विंडो क्लिअरन्ससारख्या सुविधांवर भर दिला जात आहे.

मुंबई वॉटर मेट्रोसारख्या आधुनिक जलवाहतूक संकल्पना, बंदरांची क्षमता वाढविणे, शिपिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचा विस्तार तसेच निर्यातीला चालना देणे, या माध्यमातून महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्राला नवी दिशा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

अमृतकाळात भारताची सागरी क्षमता वाढविण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे केवळ उद्योगांचा विस्तार होणार नाही, तर राज्यात रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील. महाराष्ट्राला देशातील आघाडीचे मेरिटाइम आणि सागरी व्यापाराचे केंद्र बनविण्याच्या दिशेने ही समिट निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल.