नेरूर पंचक्रोशीत ‘रणझुंझार मित्र मंडळ’ आणि जि. प. सदस्य रुपेश पावसकर पुरस्कृत भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन; विजेत्यांना मिळणार भरघोस पारितोषिके!

रणझुंझार मित्र मंडळ व जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूर पंचक्रोशी मर्यादित “कलेचा देव कलेश्वर – भव्य नरकासुर स्पर्धा २०२६” (वर्ष दुसरे) चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दिनांक ०७ नोव्हेंबर २०२६ रोजी नेरूर चव्हाटा हनुमान मंदिर येथे रात्री ठीक ०८.०० ते १०.०० या वेळेत पार पडणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या उत्कृष्ट नरकासुर मूर्ती आणि सादरीकरणासाठी आकर्षक रोख रकमा व चषक स्वरूपात पारितोषिके देण्यात येणार आहेत.
🏆 स्पर्धेची पारितोषिके:
प्रथम पारितोषिक: ₹२०,०००/- रोख रक्कम व चषक
द्वितीय पारितोषिक: ₹१५,०००/- रोख रक्कम व चषक
तृतीय पारितोषिक: ₹१०,०००/- रोख रक्कम व चषक
उत्तेजनार्थ पारितोषिक: ₹१,०००/- (इतर सर्व सहभागी मंडळांकरिता)
📋 स्पर्धा नियमावली:
१. नरकासुर स्पर्धेच्या ठिकाणी सायंकाळी ०८.०० वाजेपर्यंत आणणे बंधनकारक राहील. यानंतर आल्यास १० गुण कमी करण्यात येतील.
२. सादरीकरणात नरकासुराचा वध करणे आवश्यक आहे.
३. कथा पौराणिक कथेचा आधार घेऊन गरजेनुसार थोडाफार बदल करण्यास हरकत नाही.
४. सादरीकरणाची वेळ प्रत्येक संघासाठी जास्तीत जास्त १० मिनिटे देण्यात येईल.
५. ही स्पर्धा केवळ नेरूर पंचक्रोशीपुरती मर्यादित राहील.
६. स्पर्धा चालू झाल्यानंतर सादरीकरण एकदाच करता येईल.
७. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
📊 गुणविभागणी (एकूण १०० गुण):
नरकासुर प्रतिमा: २० गुण
वेशभूषा / रंगसंगती: १० गुण
चल चित्र: १० गुण
नाविन्यपूर्ण / वैशिष्ट्यपूर्ण: १० गुण
सादरीकरण / नरकासुर वध: ३० गुण
विषय / प्रश्नोत्तर: १० गुण
स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर आणणे: १० गुण
📞 अधिक माहिती व संपर्कासाठी:
कल्पेश मार्गी: +91 83906 16760
प्रविण नेरुरकर: +91 94229 48024
संतोष परब: +91 93709 83003
अमोल शुंगारे: +91 86054 64056
कृष्णा पाटकर: +91 93560 22387











