सिंधुदुर्गात पाणीटंचाईची भीषण शक्यता;
जुनी देयके न मिळाल्यास कंत्राटदारांची नवी कामे हाती न घेण्याची भूमिका;
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पाणीटंचाईच्या कामांवर संकट.
जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले सविस्तर निवेदन…..
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने यापूर्वी पूर्ण झालेली कामे आणि त्यांची बिले अद्याप कंत्राटदारांना मिळालेली नाहीत. असे असतानाच आता नवीन सुचवलेल्या पाणीटंचाई अंतर्गत कामांचे कंत्राटदारांना वाटप झाले आहे.
जुनी बिले मिळाल्याशिवाय कंत्राटदार नवीन कामे सुरू करणार नसल्याचे खासगीत सांगत आहेत. जर अशीच परिस्थिती कायम राहिली आणि कंत्राटदारांनी कामे बंद ठेवली, तर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, अशी भीती जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश अ. पावसकर यांनी व्यक्त केली आहे. तातडीने तोडगा काढण्याची मागणी
या गंभीर बाबीची दखल घेऊन, यावर तात्काळ तोडगा काढावा आणि पाणीटंचाईतील नवीन कामे लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी, अशी विनंती श्री. पावसकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.या पत्राची प्रत माहिती व उचित कार्यवाहीसाठी मा. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग (ओरोस) यांनाही पाठवण्यात आली आहे.











