मुंबई : मुंबईतील वडाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रामलीला महोत्सव २०२६ मध्ये आमदार निलेश राणे यांनी विशेष उपस्थिती लावत महोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांनी रामलीला महोत्सवाचे दर्शन घेत आयोजक आणि उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला.
या महोत्सवासाठी आमदार निलेश राणे यांना निमंत्रित करणारे श्री. संजयजी ठाकूर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी श्री. राकेश पांडे, महोत्सवाचे अध्यक्ष श्री. ब्रजेश उपाध्याय, श्री. मुन्ना पांडे, श्री. रमेश शुक्ला, श्री. बाळकृष्ण तिवारी, श्री. गोकर्ण त्रिपाठी, श्री. जयप्रकाश तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रामलीला महोत्सवाच्या माध्यमातून प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील आदर्श, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचा वारसा जतन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यात आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमुळे आयोजकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.











