कुडाळच्या सखावलीत मोठ्या पुलाच्या कामाचा शुभारंभ; आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पायाभरणी!

कुडाळ : आज कुडाळ तालुक्यात, नेरूर-पालमलाई मार्गावरील सखावली (ग्रामपंचायत २१५, क्र. २/३००) येथे ‘नाबार्ड ३१’ (NABARD 31) योजनेअंतर्गत एका नवीन मोठ्या पुलाच्या आणि त्याच्या जोड रस्त्याच्या बांधकामाचा पायाभरणी समारंभ आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे पार पडला. या कामामुळे एक प्रदीर्घ प्रलंबित मागणी पूर्ण झाली असून, हे काम पुढील १२ महिन्यांत पूर्ण केले जाईल.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत, उपाध्यक्ष श्री. दादा साईल, बांधकाम समिती सभापती श्री. संतोष साठविलकर, जिल्हा परिषद सदस्य सौ. दीपलक्ष्मी पडते व श्री. दीपक नारकर, कुडाळ पंचायत समिती सभापती श्री. मिलिंद नाईक, उपजिल्हाप्रमुख श्री. आनंद शिरवलकर व श्री. अरविंद कारळकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.