मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात ‘दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमिती’ची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी, पशुधन आणि पाणीटंचाईशी संबंधित समस्यांवर तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.




या बैठकीत दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने पशुधनासाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता, तसेच पाणीटंचाईवर तातडीने मात करण्यासाठी करायच्या उपाययोजनांचा समावेश होता.
दुष्काळाच्या या संकटकाळात, शेतकरी बांधवांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी आणि त्यांना आवश्यक दिलासा देण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने प्रभावी उपाययोजना राबवण्याबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
या बैठकीला उपसमितीचे सदस्य, मंत्रिमंडळातील इतर सहकारी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.











