अजय जामवाल यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची कोकण विभागीय बैठक; मंत्री नितेश राणेंची उपस्थिती

पनवेल : भाजपचे प्रदेश संघटन मंत्री माननीय श्री. अजय जामवाल जी यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत, आज पनवेल येथे कोकण विभागीय संघटनात्मक बैठक यशस्वीपणे पार पडली. या बैठकीला मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणे उपस्थित होते.

या प्रसंगी, आगामी काळातील संघटनात्मक विस्ताराशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. तसेच, संघटनेला अधिक सक्षम, प्रभावी आणि व्यापक बनवण्याबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला कोकण विभागातील आमदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, मंडलाध्यक्ष, जिल्हा मोर्चा अध्यक्ष, विभागीय समन्वयक व सह-समन्वयक, विभागीय कार्यालय मंत्री, प्रदेश सरचिटणीस, तसेच भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.