श्री कुलस्वामींच्या कृपेने सर्वांचे मंगल होवो, या मंगल भावनेतून श्री कुलस्वामी देवाचा पवित्र वार्षिक होम आणि धार्मिक उत्सव सोमवार, दिनांक २८ डिसेंबर २०२६ रोजी भक्तिभावाने संपन्न झाला.



दरवर्षीप्रमाणे यंदाही या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने श्री कुलस्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेण्याची आणि त्यांच्या कृपेचा लाभ ग्रामस्थांना भेटला. या मंगल उत्सवासाठी मुंबईसह इतर ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित राहून धार्मिक परंपरेचे जतन केले आणि या पवित्र सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. आपल्या ग्रामदैवताविषयीची श्रद्धा, भक्तिभाव आणि ग्रामस्थांमधील एकोपा अधिक दृढ करणारा हा धार्मिक उत्सव सर्वांच्या सहभागातून भक्तिमय वातावरणात साजरा झाला.
श्री कुलस्वामींच्या कृपेने सर्व ग्रामस्थांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, हीच श्रीचरणी प्रार्थना!












