केळूस येथे गुरुवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी : श्री. प्रशांत रेवणकर – कोकणशाही

केळूस – वेंगुर्ला : प्रधानमंत्री योजनेअंतर्गत जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने गुरुवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी केळूस येथे विशेष मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर आयुष्यमान आरोग्य मंदिर, केळूस येथे सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत पार पडणार आहे.

राणे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कुडाळ यांच्या माध्यमातून आयोजित या आरोग्य शिबिरामध्ये ईसीजी तपासणी, रक्तदाब व साखर तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मोफत औषध वितरण तसेच आहार व जीवनशैलीविषयक मार्गदर्शन अशा विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या शिबिरातील सेवा पूर्णतः मोफत असून, परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच योगेश शेट्ये यांनी केले आहे.

नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी अशा उपक्रमांचा लाभ घेऊन नियमित आरोग्य तपासणी करण्याचेही आवाहन करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
९३७५९५७४६१ / ९७६४६६८९६६

आरोग्य हीच खरी संपत्ती, चला आरोग्याची काळजी घेऊया!