देवगड : दिवाळीच्या उत्साहात कोकणातील पारंपरिक नरकासुर स्पर्धांची रंगत वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर फ्रेंडस् सर्कल, देवगड सडा यांच्या वतीने येत्या ७ नोव्हेंबर रोजी भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा रात्री १० वाजता फ्रेंडस् सर्कल नाका, देवगड येथे पार पडणार आहे. या स्पर्धेत खुला गट आणि मिनी नरकासुर गट अशा दोन गटांचा समावेश करण्यात आला आहे.
खुल्या गटातील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकाला १२ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ८ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाला ४ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
तर मिनी नरकासुर गटात प्रथम क्रमांकासाठी १ हजार ५०० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५०० रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. याशिवाय उत्कृष्ट सादरीकरणासाठी ‘बेस्ट एन्ट्री’चे एक हजार रुपयांचे विशेष पारितोषिकही दिले जाणार आहे.
नरकासुराच्या आकर्षक प्रतिकृती, कल्पक सजावट आणि स्पर्धकांचा उत्साह अनुभवण्याची संधी देवगडवासीयांना मिळणार आहे. त्यामुळे नरकासुर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी तयारीला लागावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी आदेश बांदेकर (७२६२०११७०८) तसेच चरण काटोकर यांच्याशी संपर्क साधावा.











