राजन साळवी यांच्या प्रकृतीची आमदार निलेश राणेंनी घेतली आस्थेने विचारपूस; लवकर बरे होण्यासाठी व्यक्त केल्या सदिच्छा!

राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. राजन साळवी यांच्यावर नुकतीच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या ते आपल्या निवासस्थानी विश्रांती घेत असून, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी राजन साळवी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी आणि त्यांनी पुन्हा एकदा जनसेवेच्या कार्यात सक्रिय व्हावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
या भेटीतून राजकीय मतभेद बाजूला ठेवून माणुसकी आणि आपुलकीचे दर्शन घडल्याची चर्चा होत आहे.
राजन साळवी यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, हीच सदिच्छा!










