रायगड : मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला तांत्रिक बिघाडाचा फटका बसला इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ही एक्स्प्रेस रायगड जिल्ह्यातील पेण रेल्वे स्थानकात तब्बल तीन तासांपासून थांबून होती
मिळालेल्या माहितीनुसार, जनशताब्दी एक्स्प्रेस सकाळी सुमारे नऊ वाजता पेण रेल्वे स्थानकात दाखल झाली. मात्र, त्यानंतर इंजिनमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने गाडी पुढे रवाना होऊ शकली नाही.
गाडी एकाच ठिकाणी दीर्घकाळ थांबल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला असून, प्रवाशांना तीन तासांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले
मुंबईहून कोकण आणि गोव्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांच्या नियोजित प्रवासावर या बिघाडाचा परिणाम झाला आहे. विशेषतः पुढील रेल्वे प्रवास, बस किंवा इतर वाहतुकीचे नियोजन असलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय
दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, गाडी नेमकी किती वेळात पुन्हा मार्गस्थ होणार, याबाबत प्रवाशांना करावी लागली प्रतीक्षा
त्यामुळे पेण स्थानकात जनशताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवाशांचा खोळंबा कायम असून, रेल्वे प्रशासनाने तातडीने बिघाड दुरुस्त करून गाडी मार्गस्थ करावी, अशी प्रवाशांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.


