पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचनेनुसार जिल्हा सरचिटणीस संदीप साटम आणि जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर
सिंधुदुर्ग : पालकमंत्री यांनी सुचित केल्याप्रमाणे आज दि.28/09/2026 भारतीय जनता पार्टी चे जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप साटम त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य सौ.सावी लोके ,श्री.देवदत्त कदम,शिरगाव पंचायत समिती सदस्य कु .शितल तावडे ,तळवडे पंचायत समिती सदस्य सौ.सलोनी तळवडेकर यांच्या सह मिलिंद साटम ,शेतकरी संतोष तावडे, उमेश घाडी ,कृषी मंडल अधिकारी लांबडे ,कृषी सहाय्यक उपस्थित होते .यावेळी शिरगांव परिसरातील शेतावर शेतीची नुकसानी पाहणी दौरा केला. आणि तात्काळ सर्वांचे पंचनामे करण्यासाठी उपस्थित असलेले कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांना सूचना केल्या. तसेच सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सरसकट मदत कशी मिळेल या साठी सर्व प्रशासकीय यंत्रणानी काम करावे अशा सूचना जिल्हा सरचिटणीस श्री संदीप साटम यांनी केल्या.











