रायगड : रायगड जिल्ह्यातील कोलाड पोलीस स्टेशन हद्दीत 5 डिसेंबर 2025 रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास गंभीर अपघात झाला. मौजे संभे गावच्या हद्दीत मोरीजवळ वरवटे पाले ते संभे स्टॉपदरम्यान, दिनेश भिकू पवार, वय 34, विठ्ठलनगर, रातवड. यांच्या होंडा शाइन मोटरसायकलवरून जाताना, समोरून आलेल्या जावीर इब्राहीम शाह, वय 28, धाटाव, रोहा, यांच्या स्कूटरला जोरदार ठोकर लागली. या धडकेत दोन्ही वाहनांवर प्रवास करणारे अशपाक मोहम्मद फारुख अली व मोहन पवहारी सिंग जखमी झाले, तर दिनेश भिकु पवार व जावीर इब्राहीम शाह यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर कोलाड पोलीसआणि एस.व्ही.आर.एस. रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होऊन जखमींना तात्काळ कोलाड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले, तर मृत व्यक्तींना शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अपघातामुळे परिसरात वाहनचालकांमध्ये सतर्कता निर्माण झाली असून, रस्त्यावरील वेगमर्यादा पाळण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. हा भीषण अपघात कोलाड परिसरातील वाहतुकीसंबंधी काळजीची बाब ठरला असून, स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधिक सुरक्षितता उपाययोजना राबवण्याच्या तयारीत आहेत. कोकणशाही रायगड












