संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवलीचा पहिला चार्टर इन्स्टॉलेशन समारंभ दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी रोटरॅक्टर आकांक्षा संतोष कांबळे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्याचबरोबर त्यांना क्लबचे चार्टर प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच रोटरॅक्टर राज समीर नलावडे यांनी सचिवपदाची, तर रोटरॅक्टर Adv.दीपिका भेराराम राठोड यांनी खजिनदारपदाची सूत्रे स्वीकारली.
नवीन अध्यक्ष रोटरॅक्टर आकांक्षा संतोष कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय वर्षासाठी “UNITE — One Team. One Vision. One Impact” ही संकल्पना जाहीर केली. “क्लबमधील प्रत्येक सदस्य महत्त्वाचा आहे, म्हणून ‘One Team’; एकत्रित ध्येय साध्य करण्यासाठी ‘One Vision’; आणि समाजात अर्थपूर्ण व सकारात्मक बदल घडवण्यासाठी ‘One Impact’,” अशी या संकल्पनेमागील भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
आगामी वर्षात सर्व सदस्यांनी एकसंघपणे कार्य करत समाजोपयोगी व प्रभावी उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. अध्यक्ष आकांक्षा कांबळे यांनी आगामी काळात रक्तदान शिबिरांचे आयोजन, नृत्य स्पर्धा तसेच करिअर मार्गदर्शन कार्यक्रम यांसारखे विविध उपक्रम राबविण्याची संकल्पना मांडली. नृत्य स्पर्धांच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र येण्याची, सक्रिय राहण्याची, आपली कला व प्रतिभा सादर करण्याची आणि आनंदाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. तसेच करिअर मार्गदर्शन कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध संधींची माहिती देऊन योग्य करिअर निवडीसाठी मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या भविष्याविषयी आत्मविश्वास निर्माण करणे, हा या उपक्रमांचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपाध्यक्षपदी मिनाक्षी रमेश मालवीया, संयुक्त सचिवपदी मनीषा रमेश मालवीया, तर सार्जंट अॅट आर्म्स म्हणून श्रेया धनंजय कसवणकर यांची नियुक्ती करण्यात आली.
नवीन बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये राजस रवी परब – आंतरराष्ट्रीय सेवा संचालक, रोटरॅक्टर प्रदीप रमेश मालवीया – सामुदायिक सेवा संचालक, रोटरॅक्टर निनाद ढवळे – व्यावसायिक सेवा संचालक, रोटरॅक्टर अथर्व पोरे – क्लब सेवा संचालक, रोटरॅक्टर गोपाळ बागायतकर – जनसंपर्क अधिकारी, रोटरॅक्टर वरुण भेराराम राठोड – सोशल मीडिया व्यवस्थापक, रोटरॅक्टर आर्किटेक्ट जुही संदीप वालावलकर – महिला सक्षमीकरण, रोटरॅक्टर भाग्येश कुडतकर – महादान चेअरपर्सन, रोटरॅक्टर विदिता जोशी – सांस्कृतिक संचालक, रोटरॅक्टर अॅड. पद्मज बेलवलकर– आरोग्य व स्वच्छता, रोटरॅक्टर जीवन राणे – प्राणी कल्याण, रोटरॅक्टर मनीष करपे – क्रीडा चेअरपर्सन, प्रांजल सावंत – रोटरॅक्ट सप्ताह चेअरपर्सन आणि रोटरॅक्टर अक्षय उचले – उद्योजकता विकास चेअरपर्सन यांचा समावेश आहे.
तसेच क्लबचे सदस्य म्हणून रोटरॅक्टर हिमांशू तांबे, रोटरॅक्टर सौरभ बेलवलकर, रोटरॅक्टर यामिनी आंग्रे आणि रोटरॅक्टर युवराज आंग्रे, यज्ञेश रासम यांचा समावेश आहे.
क्लबच्या स्थापनेत रोटरी क्लबच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया नलावडे यांचा मोठा सहभाग होता तसेच या संपूर्ण प्रवासात क्लबचे मार्गदर्शक आणि RCC रोटेरियन संतोष कांबळे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटेरियन प्रणय तेली उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून PDRR PHF रोटेरियन रोटरॅक्टर निखिल चिंदक , इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून डिस्ट्रिक्ट रोटरॅक्ट रिप्रेझेंटेटिव्ह रोटेरियन रोटरॅक्टर अमेय वरेकर, तसेच झोनल रोटरॅक्ट रिप्रेझेंटेटिव्ह PHF रोटरॅक्टर निकिता आराबेकर यांची उपस्थिती लाभली.
यावेळी डिस्ट्रिक्ट रोटरॅक्ट रिप्रेझेंटेटिव्ह रोटेरियन रोटरॅक्टर अमेय वरेरकर यांनी रोटरॅक्ट चळवळीबाबत सविस्तर माहिती देत रोटरॅक्ट क्लब म्हणून एकत्रितपणे आणि प्रभावीपणे कशा प्रकारे कार्य करता येईल, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच झोनल रोटरॅक्ट रिप्रेझेंटेटिव्ह PHF रोटरॅक्टर निकिता आराबेकर यांनी सर्व सदस्यांनी एकजुटीने काम करून क्लबची उद्दिष्टे कशा प्रकारे साध्य करता येतील, याबाबत मार्गदर्शन केले. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटेरियन प्रणय तेली यांनीही नवीन पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना मोलाचा सल्ला व मार्गदर्शन केले.
रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. सुप्रिया समीर नलावडे यांनी रोटरेक्ट क्लबच्या सदस्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच रोटरी सदस्य तुमच्या सदैव पाठीशी राहतील याची ग्वाही दिली तसेच रोटरी सचिव रोटेरियन डॉ. अमेय मराठे यांनी रोटरॅक्ट सदस्यांना आगामी वर्षात नव नवीन प्रोजेक्ट कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले तसेच या समारंभाला कणकवली नगरपंचायत चे नगराध्यक्ष माननीय संदेश पारकर यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी, कुडाळ, बांदा आणि खारेपाटण येथील रोटरॅक्ट सदस्य, तसेच कुटुंबीय, मित्रमंडळी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पहिल्याच चार्टर इन्स्टॉलेशन समारंभातून रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवलीने एकसंघ नेतृत्व, मैत्री, सेवा आणि समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याच्या नव्या प्रवासाची दमदार सुरुवात केली. “UNITE — One Team. One Vision. One Impact” या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून क्लब आगामी काळात समाजहितासाठी विविध उपक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन Adv. दीपिका राठोड, आणि आर्किटेक जुही वालावलकर यांनी केले आणि राज नलावडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले












