बेपत्ता खलाशाचा मृतदेह सापडताच देवगड बंदर परिसरात खळबळ!

देवगड : देवगड बंदरातील ‘एकदंत’ या नौकेवरून बेपत्ता झालेला खलाशी वासुदेव गणपत कांबळे (५८, मूळ रा. डोर्ले, गावखडी रत्नागिरी, सध्या रा. देवगड बंदर) याचा मृतदेह बंदर परिसरातील खाडीच्या पाण्यात आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास नारायण खांदारे यांच्या ‘एकदंत’ या नौकेवर दशरथ बोराटे यांच्यासोबत वासुदेव कांबळे हे खलाशी म्हणून काम करीत होते. शुक्रवारी रात्री हे सर्वजण नौकेवर झोपले होते. यातील वासुदेव कांबळे हे शनिवारी पहाटेच्या सुमारास नौकेवर दिसले नाहीत. त्यांचा शोध घेण्यात आला, परंतु ते सापडले नाहीत. त्यामुळे ते बेपत्ता असल्याची फिर्याद दशरथ अशोक बोराटे (३८. मूळ रा. गावखडी-रत्नागिरी, सध्या रा. देवगड बंदर) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली होती.