कट्टा, मालवण : ‘कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ’ संचलित वरदकर हायस्कूल आणि आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कट्टा येथे, आमदार निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती होती शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख श्री. किशोर पाटकर यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा आणि प्रोत्साहन मिळाले.
याप्रसंगी शिवसेना उपनेते श्री. संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, बांधकाम समिती सभापती श्री. संतोष साठविलकर, पंचायत समिती सभापती श्रीमती प्रज्ञा चव्हाण, उपजिल्हाप्रमुख श्री. अरविंद कारळकर, युवा सेना जिल्हाप्रमुख श्री. संग्राम साळसकर, तालुकाप्रमुख श्री. मंदार लुडबे, श्री. बबन शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि नागरिक उपस्थित होते.












