“केसरकरांच्या उपस्थितीत विकासाचा आढावा; सौर पाणीपुरवठा योजनेला गती”

सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी, वेंगुर्ले – आणि दोडामार्ग तालुक्यातील मंजूर व प्रस्तावित विकास कामांच्या प्रगतीचा आढावा – घेण्यासाठी आमदार दीपक – केसरकर यांच्या उपस्थितीत – महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विकास योजनांवर – सविस्तर चर्चा होऊन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप, तहसीलदार ओंकार ओतारी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत तिलारी ते वेंगुर्ले पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित महत्वाकांक्षी करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. या योजनेसाठी आवश्यक जागा मागणीचा प्रस्ताव तातडीने पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. या निर्णयामुळे शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच सावंतवाडी येथील महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या इमारतीच्या बांधकामासंदर्भात पुनर्वसन विभाग व इतर आवश्यक परवानग्या लवकरात लवकर मिळवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
ग्रामीण भागातील रस्ते विकासालाही प्राधान्य देत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलें. यासोबतच आणखी नवीन कामे प्रस्तावित करण्याचे निर्देश आमदार केसरकर यांनी दिलें.

वेंगुर्ले तालुका क्रीडा संकुलाच्या विकासावरही भर देण्यात आला. येथे नवीन रनिंग टॅक उभारणे, खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सावंतवाडी व दोडामार्ग तालुका क्रीडा संकुलांसाठी प्रशासकीय इमारत, बहुउद्देशीय हॉल आणि विविध खेळांच्या मैदानांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. अद्ययावत सुविधा देताना बॅडमिंटन कोर्ट उभारण्याचाही निर्णय झाला. बांदा तालुका क्रीडा संकुलासाठी तांत्रिक मान्यता घेऊन प्रस्ताव नियोजन विभागाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तिलारी पाणीपुरवठा योजनेतून सावंतवाडी रोड रेल्वेस्टेशन, कुंभार्ली, ब्राह्मणपाट व मळगाव या भागांना पाणीपुरवठा करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.