दोडामार्गात शिवसेनेचे आ. निलेश राणेंची संघटनात्मक बैठक , कार्यकर्त्यांना नवे बळ

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक शुक्रवारी, २४ एप्रिल रोजी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली.

बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटना अधिक सक्षम आणि मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले. आगामी काळात पक्षवाढीसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

याचवेळी दोडामार्ग येथील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या बैठकीस माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संजू परब, उपजिल्हाप्रमुख राजू निंबाळकर व शैलेंद्र दळवी, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस आणि गोपाळ गवस, जिल्हा परिषद सदस्य साक्षी तळवडेकर, पंचायत समिती सदस्य सायली निंबाळकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, बैठकीत संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला असून कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.