वेंगुर्ला : वेंगुर्ले-सावंतवाडी मुख्य मार्गावर मठकरवाडी येथील भीषण अपघातात एका २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुभम संतोष गुरव (वय २४, रा. पोंभुर्ले, देवगड) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती, ज्यामुळे रस्ता ओला आणि निसरडा झाला होता. शुभम हा आपल्या दुचाकीने वेंगुर्त्याहून देवगडच्या दिशेने जात असताना, मठकरवाडी येथे त्याची दुचाकी घसरली. रस्ता ओला असल्यामुळे गाडीवरील ताबा सुटल्याने दुचाकी समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीला जाऊन जोरात धडकली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून शुभम गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि रुग्णवाहिकेच्या साहाय्याने शुभमला अधिक उपचारासाठी वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, दुर्दैवाने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तरुणपणात शुभमचा असा अपघाती मृत्यू झाल्याने पोंभुर्ले परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोकणशाही वेंगुर्ला












