कोकण किनारपट्टीवर संकटाचे ढग! यंदा 24 दिवस समुद्र ‘उधाण’

4.5 मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार, 145 गावांना सतर्कतेचा इशारा

रायगडातील 145 गावांना यावर्षी पुराचा धोका उद्भवणार आहे. पावसाळ्यात २४ दिवस मोठे उधाण येणार असून तब्बल साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत. याच काळात मुसळधार पाऊस कोसळल्यास किनारपट्टीवरील गावांमध्ये पाणी घुसून पुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत.
पावसाळ्यात समुद्राला मोठे उधाण येत असते. उधाणामुळे समुद्रकिनाऱ्यावर उसळणाऱ्या लाटांमुळे किनारपट्टीवरील भागात समुद्राचे पाणी शिरते. त्यातच मुसळधार पाऊस पडल्यास 26 जुलै 2005 व 19 ते 24 जुलै 2019 सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. महाराष्ट्र मेरिटाइम महिना – दिनांक
जून – 14 ते 11
जुलै – 13 ते 18
ऑगस्ट – 12 ते 16
सप्टेंबर – 10 ते 13, 28 ते 30
बोर्डाकडील वेळापत्रकानुसार यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला 24 दिवस मोठे उधाण येणार आहे. यावेळी साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत. रायगडातील समुद्रकिनारी 46 तर खाडीकिनारी असलेल्या 99 अशा 145 गावांना पुराचा फटका बसणार आहे.
आपली व्यवस्थापन टीम अॅक्शन मोडवर
उधाणाचा सर्वात मोठा फटका कोकणातील समुद्र तसेच खाडी किनाऱ्यावरील गावांना बसणार आहे. उधाणावेळी मुसळधार पाऊस पडल्यास या गावांना पूरस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील गावांमध्ये उपाययोजनांची तयारी संबंधित जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांनी सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात तालुकास्तरावरून आधीच आपत्ती व्यवस्थापन आराखडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागांनी मागवले.कोकणशाही रायगड