आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मालवण तालुकाप्रमुख पदी मंदार संजय लुडबे यांची नियुक्ती

मालवण : शिवसेनेचे देवबाग विभागप्रमुख मंदार संजय लुडबे यांना बढती देण्यात आली असून तालुकाप्रमुख राजा गावडे यांच्या जागी तालुकाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मंदार लुडबे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास त्यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी तालुकाप्रमुख विनायक बाईत, राजा गावडे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, युवासेना तालुकाप्रमुख अभि लाड, शिवसेना तालुका चिटणीस मकरंद राणे, छोटू ठाकूर, संदीप भोजणे, उमेश बिरमोळे, महेश लुडबे, सुरज बिरमोळे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कोकणशाही मालवण