साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग: फणसगाव पंचायत समितीच्या ३० क्रमांकाच्या सर्वसाधारण महिला मतदारसंघात भाजपच्या समृद्धी संतोष चव्हाण या बिनविरोध निवडून आल्या आहेत. शिवसेना (उबाठा) च्या रोहिणी संतोष लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही जागा बिनविरोध झाली. दरम्यान, १७ क्रमांकाच्या किंजवडे जिल्हा परिषद सर्वसाधारण महिला मतदारसंघात निवडणूक रिंगणात बदल झाला आहे. या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मनस्वी महेश घारे आणि शुभांगी विठ्ठल राणे यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.












