रक्तदान हेच श्रेष्ठ दान! वेंगुर्ल्यात जय हनुमान मित्रमंडळाचा पुढाकार

वेंगुर्ल्यात १२ नोव्हेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन; जय हनुमान मित्रमंडळाचा पुढाकार!

वेंगुर्ले : रक्तदान हेच श्रेष्ठ दान आणि माणुसकीची खरी ओळख! याच सामाजिक भावनेतून वेंगुर्ले येथे जय हनुमान मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

वेंगुर्ले येथील जय हनुमान मित्रमंडळ, जुना स्टँड यांच्या पुढाकाराने येत्या १२ नोव्हेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ले येथे हे रक्तदान शिबिर पार पडणार आहे.

‘माणुसकीची जाण…. चला करूया रक्तदान!’ या प्रेरणादायी घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराची वेळ सकाळी ९ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत असणार आहे.

रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत समाजात जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

या सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन जय हनुमान मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

या शिबिरासाठी नावनोंदणी करण्यासाठी इच्छुक रक्तदात्यांनी ७७७९०४४६८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

तेव्हा चला, एक पाऊल माणुसकीच्या दिशेने टाकूया… रक्तदान करूया आणि गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यास हातभार लावूया!