मानेगाव शाळेला नवी झळाळी! आमदार निलेश राणेंच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या मंडपाचे उद्घाटन

कुडाळ – सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील मानेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ४ च्या नूतनीकरण केलेल्या मंडपाचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री. दत्ता सामंत, श्री. रमाकांत ताम्हणेकर, श्री. काका कुडाळकर, कुडाळचे अध्यक्ष श्री. मिलिंद नाईक, श्री. आनंद शिरवलकर, श्री. अरविंद करळकर, सरपंच सौ. मनीषा भोसले यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते.