सरंबळच्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा आधार! रुपेश पावसकरांच्या हस्ते मका बियाण्यांचे वाटप

सरंबळ येथे शेतकऱ्यांना शासकीय मका बियाणे वाटप

कुडाळ : सरंबळ गावातील शेतकरी बांधवांना जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या हस्ते शासकीय पशु विभाग मार्फत मका पीक बियाण्याचे वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायत सरंबळ कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांना शासनामार्फत मिळालेले सुधारित मका बियाणे देण्यात आले. यावेळी सरपंच रावजी कदम, ग्रामसेविका, पशु विभाग अधिकारी,ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी याचा नक्की फायदा होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.तसेच शेतकऱ्यांच्या मागणी नुसार कमी प्रमाणात बियाणे उपलब्ध झाल्याने रुपेश पावसकर यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकारी यांना जाब विचारत मागणी नुसार पुरवठा झाला पाहिजे आणि मका पीक करणारा कुठलाही शेतकरी वंचित राहू नये याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली.