अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी एकापेक्षा अधिक गावांमध्ये असतात, मात्र ‘फॉर्मर आयडी’ (Farmer ID) काढताना इतर गावांमधील जमिनीची नोंद करताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. या समस्येबाबत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सदस्य श्री.रुपेश अशोक पावसकर यांनी कुडाळ तहसीलदारांना पत्र लिहून योग्य त्या मार्गदर्शनाची मागणी केली आहे. सध्या शेतकऱ्यांसाठी ‘फॉर्मर आयडी’ काढणे बंधनकारक व गरजेचे ठरत आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वेगवेगळ्या गावांत पसरलेल्या आहेत. यामध्ये एकाच गावातील जमीन फॉर्मर आयडीमध्ये सहज नोंद होत असली, तरी इतर गावांमधील जमिनीची नोंद करताना अडचणी येत आहेत. याविषयी अनेक शेतकरी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्याकडे विचारणा व तक्रारी करत होते.
याच पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या या समस्येची दखल घेत जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून, या अडचणींवर तात्काळ तोडगा काढून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली आहे.











