वाडा हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा! तीन कुस्तीगीरांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

सिंधुदुर्ग : बुधवार दि.३० सप्टेंबर २०२६ रोजी ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत वाडा हायस्कूलच्या सहा खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोऊन तीन कुस्तीगीरांनी सातारा येथे विभागीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान मिळवला.

(१४ व१७ वर्षा खालील – मुली)

३९ किलो गट-‘- गार्गी निलेश वाडेकर — प्रथम
४६ किलो गट-‘- निधी कमलेश मोंडे—– प्रथम
५३ किलो गट-‘- कुंजल दिनेश गावकर —- प्रथम

(१४ व १७ वर्षा खालील – मुले)

३८ किलो गट-‘- श्रेयस समीर परकर —- द्वितीय
४४ किलो गट-‘- आयुष संदीप पुरळकर—- द्वितीय
६५ किलो गट-‘- विरेन सचीन गावकर —– द्वितीय
प्रथम आलेल्या कुस्तीपटूंची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री.उत्तरेश्वर लाड, यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन स्थानीय समितीचे अध्यक्ष श्री. शांताराम पुजारे, शाळा समिती अध्यक्ष श्री. हर्षद जोशी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता तेली, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पंचक्रोशीतील पालक वर्गांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.