लालबागच्या राजाच्या चरणी आमदार प्रमोद जठार नतमस्तक; कोकणच्या विकासासाठी मागितले आशीर्वाद!

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध श्री लालबागच्या राजाचे आमदार प्रमोद जठार यांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी महाराष्ट्रासह कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
गणरायाचे आशीर्वाद घेताना कोकणातील जनतेला सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे, तसेच कोकणच्या विकासाला अधिक गती मिळावी, अशी मनोकामना आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केली. लालबागच्या राजाच्या दर्शनाने मनाला समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळाल्याची भावना आमदार जठार यांनी यावेळी व्यक्त केली.