वेंगुर्ले ते अक्कलकोट प्रवास आता अधिक सोयीचा; ३० ऑगस्टपर्यंत जादा बसची सुविधा!

वेंगुर्ले : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वेंगुर्ले आगारातर्फे २५ ते ३० ऑगस्ट या कालावधीत दररोज सकाळी ७.४५ वाजता वेंगुर्ले-अक्कलकोट ही जादा बस सोडण्यात येणार आहे. ही बस वेंगुर्ले बस स्टॅण्डवरून निघणार असून मठमार्गे कुडाळ, कणकवली, बावडामार्गे अक्कलकोट असा प्रवास करणार आहे. अधिक माहितीसाठी नवज्योत गावडे- ९३७१९११०७३ यांच्याशी संपर्क साधावा. या बसचा बहुसंख्येने लाभघ्यावा, असे आवाहन वेंगुर्ले आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे व वाहतूक निरीक्षक तेजस तारी यांनी केले आहे.