फोटोग्राफर असोसिएशन वतीने राजापूरात मोफत सिनेमॅटीक कार्यशाळा

राजापूर : फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन रत्नागिरी जिल्हा आणि फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन राजापूर तालुका यांच्यावतीने आयोजित आणि सोनी कंपनी आणि सारडा ग्रुप सांगली पुरस्कृत ॲडव्हान्स सिनेमॅटिक मास्टर क्लास या कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्कशॉप
मंगळवार दि.25 ऑगस्ट रोजी
सकाळी 10 ते सायंकाळी 05 या वेळेत मुंबई गोवा हायवे राजापूर येथील हॉटेल गुरुमाऊली याठिकाणी हि कार्यशाळा संपन्न होणार आहे. ही कार्यशाळा संपूर्ण मोफत आहे.तरी रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व फोटोग्राफर व्हिडीओग्राफर बंधूनी कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे , तसेच सोनी कंपनीच्या वतीने माननीय अभिजीत पाबरेकर सर यांच्याकडून अद्यावत कॅमेऱ्याची माहिती करून घ्यावी. तसेच सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी बद्दल माननीय शरद पोखरकर सर, आणि मा शरद सारडा सर यांच्याकडून व्यावसायिक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन राजापूर तालुका अध्यक्ष प्रितेश देवळेकर, जिल्हा अध्यक्ष श्री संजय शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष श्री कांचन मालगुंडकर , सचिव प्रवीण पाटोळे, खजिनदार सुरेंद्र गीते संघटक संदेश टिळेकर यांनी केले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी श्री. गुरु चौगुले रत्नागिरी ( जिल्हा कार्याध्यक्ष )
9730414447 यांच्याशी संपर्क साधावा असे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
