✍️ शब्दांना मिळणार नवी धार; कणकवली महाविद्यालयात साहित्य लेखन कार्यशाळा!

कणकवली महाविद्यालयातर्फे उद्या साहित्य लेखन कार्यशाळा

अजय कांडर, डॉ. सई लळीत, डॉ.अनिल फराकटे यांचे मार्गदर्शन

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली :
कणकवली महाविद्यालयाच्या ‘कनक’ नियतकालिक विभागाच्या वतीने मंगळवार 25 ऑगस्ट रोजी स.10 वा. जिल्हास्तरीय साहित्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्र.प्राचार्य डॉ. युवराज महालिंगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या शाळेसाठी नामवंत कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर, मालवणी लेखिका – कवयित्री डॉ.सई लळीत आणि सुप्रसिद्ध स्तंभ लेखक डॉ. अनिल फराकटे यांना मार्गदर्शन साठी निमंत्रित करण्यात आले आहे.
कार्यशाळा कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात होणार असून कार्यशाळेची रूपरेषा पुढील प्रमाणे -सकाळी ८ ते ९ नोंदणी, तर सकाळी ९ ते ९.३० उद्घघाटन.पहिले सत्र – स ९.३० ते १०.३० – काव्य लेखन मार्गदर्शक अजय कांडर.दुसरे सत्र – सकाळी १०.३० ते ११.३० – ललित लेखन
मार्गदर्शक डॉ. सई लळीत, तिसरे सत्र – दुपारी ११.४० ते १२.४० – कथात्मक वाङ्ममय.मार्गदर्शक डॉ. अनिल फराकटे, दुपारी १२.४० ते १ प्रमाणपत्र वितरण व समारोप.
कार्यशाळाचे संयोजक म्हणून डॉ. सोमनाथ कदम, प्रा. सीमा हडकर, प्रा. एस. आर. जाधव, प्रा. दीपा तेंडोलकर, प्रा. विजयकुमार सावंत, प्रा. मीना महाडेश्वर, प्रा. विजय सावंत, प्रा. माधुरी राणे, प्रा. नेहा घोणे हे काम पाहत आहेत.जिल्ह्यातील साहित्यात रुची असलेल्या विद्यार्थी आणि लेखक कवीनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘कनक’ नियतकालिक विभाग, कणकवली कॉलेज, कणकवली यांच्यावतीने करण्यात आले आहे.