
मुंबई : सूचना मरीन प्रा. लि. या कंपनीकडून ‘Water Ambulance Service for the Maharashtra Coast’ या महत्त्वपूर्ण संकल्पनेचे सादरीकरण मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत मंत्रालयातील दालनात करण्यात आले.
महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीवरील मच्छीमार, सागरी कामगार तसेच किनारी भागातील नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा जलदगतीने उपलब्ध करून देण्यासाठी वॉटर अॅम्ब्युलन्स सेवा उपयुक्त ठरणार आहे. या माध्यमातून समुद्रात किंवा दुर्गम किनारी भागात उद्भवणाऱ्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचविता येणार आहे.
यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पी.प्रदीप, मत्स्यआयुक्त प्रेरणा देशभ्रतार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.












