आंबोलीत पर्यटकांची गैरसोय थांबणार! पालकमंत्री नितेश राणेंच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

सिंधुदुर्ग : आंबोलीतील वाहतूक, पर्यटक सुविधा आणि भविष्यातील नियोजन याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
आंबोली पर्यटनस्थळी वाढत्या पर्यटकसंख्येमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आंबोली येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी पर्यटन विभागाच्या जागेत वाहन पार्किंग व्यवस्था उभारण्यासह धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी ई-वाहन सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे ही पार्किंग व्यवस्था येत्या आठ दिवसांत कार्यान्वित करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित विभागांना दिले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे दत्तू नार्वेकर, तसेच वन, पर्यटन आणि पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.