वेंगुर्ले : कै. महेश परब यांच्या स्मरणार्थ “जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १६ ऑगस्टला सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वेंगुर्ले येथे पार पडणार असून, डॉ. अजित साटेलकर मित्रमंडळ यांच्या वतीने तसेच श्रीचेस अकॅडमी व नवजीवन चेस अकॅडमी यांच्या सहकार्याने स्पर्धा होणार आहे.
स्पर्धा १६ वर्षांखालील, १३ वर्षांखालील आणि १० वर्षांखालील अशा तीन गटांत होणार आहे. प्रत्येक गटातील विजेत्यांना प्रथम रु. १,५०० व चषक, द्वितीय रु. १,००० व चषक, तृतीय रु. ७५० व चषक, चतुर्थ रु. ५०० व चषक आणि पाचवा रु. ३०० व चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक गटात उत्तेजनार्थ पदके दिली जाणार असून सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
याशिवाय ‘बेस्ट वेंगुर्ले (मुलगा)’ आणि ‘बेस्ट वेंगुर्ले (मुलगी)’ यांना प्रत्येकी रु. ५०० व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेची प्रवेश फी रु. २०० असून नावनोंदणीची अंतिम तारीख १४ ऑगस्ट आहे. स्पर्धेसाठी इच्छुकांनी ९३७३४८६००० वर खेळाडूचे पूर्ण नाव, जन्मतारीख व फोटो पाठवून नोंदणी करावी. जास्तीत-जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.












