कणकवली : असलदे गावात दारूबंदी असताना अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्रमक
भूमिकेचे आमदार निलेश राणे यांनी कौतुक केले आहे. ग्रामस्थांनी संबंधित दारू विक्रेत्याला जाब विचारत समज दिल्यानंतर त्या दारू विक्रेत्याने पुन्हा अवैध धंदा न करण्याची कबुली दिली. त्याबाबतचा व्हिडिओ राणे यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत असलदे ग्रामस्थांचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कणकवली तालुक्यातील असलदे ग्रामस्थांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. गावात दारुबंदी असताना दारू विक्रेत्याला जाब विचारत त्याला ताब्यात घेत समज दिली. असे जागरुक ग्रामस्थ प्रत्येक गावात असले पाहिजेत. तुम्ही सिंधुदुर्गाला नवीन सुरुवात करून दिली आहे.












