सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरांचे तसेच वीज यंत्रणेचे झालेल्या नुकसानी संदर्भात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. यावेळी प्रत्येक तालुकानिहाय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने आणि सर्वोतोपरी मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या.


जिल्ह्यातील वीज व पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याबरोबरच नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. लोकांचे म्हणणे समजून घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. एल-निनोमुळे भविष्यात हवामानातील बदलांची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी ठेवावी, असेही स्पष्ट केले.
येत्या पावसाळ्याच्या दृष्टीने महावितरणसह सर्व विभागांनी मनुष्यबळ, यंत्रसामग्री, ब्रेकडाऊन पथके आणि संपर्कयंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देशही दिले. या बैठकीस दूरदृश्य प्रणालीने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच महावितरणचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित उपस्थित होते.












