संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे रवींद्र यादव यांची निवड झाली आहे.
या निवडीनंतर भाजप पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांकडून रवींद्र यादव यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, सरपंच संदीप मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर तसेच शक्तिकेंद्र प्रमुख स्वप्नील चिंदरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विजय चिंदरकर, महेश लाड, दिनेश गोठणकर, शिशिर परुळेकर, नितीन पवार, अनुप वारंग, प्रियाली आचरेकर, तनिष्क लोकरे, स्वाती नारकर, इफात शेख, नजराणा शेख, हेलन कांबळे, श्रेयस चिंदरकर, सचिन खोचरे, प्रीती मेस्त्री, मिलिंद चिंदरकर, आबा कोरगावकर, परेश कांबळी, संतोष रेवंडकर, गणेश पुजारे, ऋत्विज राणे, स्वरूप कोरगावकर, समर्थ कोरगावकर, प्रणय शिर्के, समीर राजपूत, महेश मेस्त्री, कैलास साटेलकर, सागर पवार, परेश आचरेकर, नागेश लाड आणि प्रतीक माइनकर यांच्यासह कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.
रवींद्र यादव यांच्या निवडीमुळे कलमठ ग्रामपंचायतीच्या कारभाराला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












